Electoral bonds explained / इलेक्टोरल बॉण्ड म्हणजे काय? (BBC News Marathi)

Share it with your friends Like

Thanks! Share it with your friends!

Close

Electoral bond ला मराठीत निवडणूक रोखे असं म्हणतात. हा एक प्रकारचा चेक समजा, ज्याद्वारे राजकीय पक्षांना देणगी देता येते.

हा चेक तुम्ही कोणत्याही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून मिळवू शकता. देणगी देणाऱ्यांची माहिती SBI कडे असेल आणि त्यांच्या पैशांचा स्रोतही SBI ला माहिती असेल. त्यामुळे राजकीय पक्षांना देणगी देण्याची प्रक्रिया पारदर्शक होईल, असं सरकारचं म्हणणं आहे.

पण खरी गंमत तर वेगळीच आहे. या प्रक्रियेवर निवडणूक आयोगालाच भरवसा नाही. अशा प्रकारे पक्षांना देणगी देण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची पारदर्शकता नाही, असं म्हणणारं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात सादर केलं आहे.

पण केंद्र सरकारचं म्हणणं वेगळं आहे. सध्या सुप्रीम कोर्टात असलेलं हे प्रकरण ऐन लोकसभा निवडणुकांच्या वातावरणात का गाजतंय?

सांगत आहेत बीबीसी मराठीच्या अनघा पाठक.
एडिटिंग – आशिष कुमार

.
.
.
_
अधिक माहितीसाठी :

www.bbc.com/marathi
www.facebook.com/bbcnewsmarathi/
twitter.com/bbcnewsmarathi

Comments

MICROVISION DETECTIONS says:

सर्व निवडणूक फंड शासकीय तिजोरीत जमा व्हावा व तेथूनच समानतेच्या तत्त्वावर शासकीय यंत्रणेमार्फतच सर्व संबंधित उमेदवारांच्या जाहिराती व माहिती, कार्य, लोकशाही वृत्ती, राष्ट्र निर्मिती विषयी वैज्ञानिक मानसिकता, भारतीय राज्यघटने बद्दलची माहिती व अंमल करण्याची कुवत इत्यादी बाबींचा लेखाजोखा जनमानसात पोचवायला हवा तथापि शासकीय यंत्रणेचा कोणताही गैरवापर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे निवडून आलेल्या उमेदवारास शासकीय अर्थात पब्लिक सेक्टर मधीलच सर्व सुविधांचा वापर करण्याचे तत्व बंधनकारक करून त्यांचे अत्यल्प मानधन या संकल्पनेवर लोकसेवा करण्याची इच्छा असल्याचे शपथपत्र घेऊन फक्त पाच वर्ष जनसेवक या पदासाठी नियुक्ती करावी व त्याच दरम्यान त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी त्यांच्या दैनंदिनीचा लेखाजोखा व लोकांच्या प्रतिक्रिया समजून घेऊन, अपप्रवृत्ती आढळून आल्यास योग्य ती शिक्षा तातडीने देत त्याच निवडणूकीतील दुसऱ्या नंबरच्या उमेदवारास संधी देण्यात यावी.
( हे सर्व आपणास स्वप्नवत वाटत नाही ? ) microMAN

Sagar Bharane says:

पार्टी फंड हा लोकजाहीर असावा आणि त्याचा वापर कुठे झाला याचा हिशोब निवडणूक आयोगाला दिला तर देशाला खूप विकास होईल………….. मी एक भारतीय

MAYUR GHOGARE says:

Good Analysis for Unique Subject
Nice Explained

Comments are disabled for this post.

%d bloggers like this: